जळगाव : मृतदेहाची चक्क अदलाबदली : गोदावरी हॉस्पिटल चा प्रकार ...

 जळगाव : मृतदेहाची चक्क अदलाबदली : 

गोदावरी हॉस्पिटल चा प्रकार ... 



जळगाव येथील भुसावळ शहरात घडलेला प्रकार ...                                 

मुस्लिम भागातील रहिवासी फातेमाबी  पिंजारी वय  ६५ वर्ष यांना  हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होता त्यांची कोरोना चाचणी हि निगेटिव्ह आलेली असूनही त्यांचे निधन झाल्याचे हॉस्पिटल मधून कळविले गेले. त्यानंतर त्यांचे नातेवाईक मृतदेह घेण्यास गेले असता त्यांना हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी मृतदेह पाहू देण्यास सक्त नकार देऊन रुग्णवाहिकेतून मृतदेह रवाना केले. घरी रुग्णवाहिकेतून मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यावेळेस नातेवाईकांना समजले कि हा मृतदेह फातेमाबी यांचा नसून दुसऱ्याच महिलेचा आहे व हे पाहून सर्व थक्क झाले . 

Rs. 1654


यात चौकशी केली असता लक्षात आले कि हा मृतदेह एका हिंदू महिलेचा आहे. याबाबत संजय राऊत, माजी नगर अध्यक्ष  पिंजारी यांनी मृत कुटूंबियांची भेट घेऊन झालेला प्रकार जाणून घेतला  यात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल व त्याबाबत आम्ही पाठपुरावा करू असे सांगितले... आता यावर नक्की काय कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


Comments