जळगाव : हरिविठ्ठल नगरात सट्टा जुगार खेळणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल
हरिविठ्ठल नगर, जळगाव पुलाजवळ सट्टा खेळविणाऱ्या दोन जणांवर रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हरिविठ्ठल नगर पुलाजवळ एक जण सट्टा खेळवीत असल्याची बातमी रामानंद नगर येथील सहाय्यक निरीक्षक राजेश शिंदे यांना मिळाली त्यांनी तात्काळ विजय खैरे, गोपाळ चौधरी, उमेश पवार, रवींद्र चौधरी यांचे पथक घेऊन तेथे चौकशी केली असता त्यांना एक व्यक्ती सट्टा जुगार खेळवीत असतांना दिसले त्यांनी त्या ठिकाणा हुन कैलास सुभाष पाटील वय (३०) राहणार खंडेराव नगर व सट्टा खेळण्यास प्रवृत्त करणारी आरती भिल राहणार हरिविठ्ठल नगर या दोघांना अटक केली त्यांच्याकडून काही रोख रक्कम व सट्टा खेळण्यासाठी लागणारे साहित्य जमा केले या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल विजय खैरे यांच्या फिर्यादीवरून मुंबई जुगार कायद्या अंतर्गत रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Comments
Post a Comment